रत्नागिरी

लोकमान्य टिळक वाचन मंदिराकडून माजी आमदार रमेशभाई कदम यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान

लोकमान्य टिळक वाचन मंदिराकडून माजी आमदार रमेशभाई कदम यांना सन्माननीय सदस्यत्व प्रदान

चिपळूण प्रतिनिधी – प्रदीप पवार
२०२१ च्या महापुरामध्ये उध्वस्त झालेले चिपळूण मधील पुरातन वस्तू संग्रहालय अद्यावत अशा नव्या दालनामध्ये सुरू करण्यात आले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने हे संग्रहालय सुरू करण्यात आले. जनतेसाठी नव्याने खुले झालेल्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचा उद्घाटन सोहळा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा सन्माननीय उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी चिपळूणचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, पोलिस अधीक्षक श्री. राजमाने , चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक विशाल भोसले, पुरातन वस्तुसंग्राहक डॉ. श्रीधर ठाकूर , लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव , कार्याध्यक्ष धनंजय चितळे उपस्थित होते. चिपळूणातील वाचन संस्कृतीच्या योगदानात गेली ३० वर्षांहून अधिक वर्षे मोलाचा वाटा असलेले रमेशभाई कदम यांना वाचनालया तर्फे सन्माननीय सदस्यत्व माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते देण्यात आला. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी व चिपळूणचे नागरिक उपस्थित होते.

Back to top button