बीड

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध..

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध..

निर्भीडपणे हिंदू मुस्लिम वाद न करता बेधडक मदतीसाठी पुढे होवून साद देणाऱ्या रणरागिणी पूजाताई मोरे यांनी जोपासली सामाजिक कर्तव्य
कोळगाव बाळासाहेब घाडगे – जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील पर्यटन स्थळ असणार्या ठिकाणी दि.२१ एप्रिल २०२५ रोजी नक्षलवादी हल्ला चढवला. यामध्ये २६ नागरिक मृत्युमुखी पडले. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण देशात भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान हल्ल्यानंतर निर्भीडपणे हिंदू मुस्लिम वाद न करता जम्मू काश्मीर मध्ये लग्नानंतर फिरायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पुजाताई मोरे भारत एकता शांतता राहण्याच्या अनुषंगाने बेधडक प्रतिक्रिया मदतीसाठी पुढे होवून साद देणाऱ्या रणरागिणी पूजाताई धनंजय जाधव मोरे या पत्नी पतीने तेथील नागरिकांना पर्यटकांना धीर देत असून सामाजिक कर्तव्य जोपासली जात आहे.
    जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शबैसरन भागात मंगळवारी दि.२२ एप्रिल २०२५ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २०- २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशात भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चातील रणरागिणी असणाऱ्या पुजा मोरे ह्या लग्न विवाहानंतर पती सोबत फिरायला म्हणून काश्मीर येथे गेल्या होत्या. पण अचानक हा नक्षलवादी हल्ला झाला. ह्या घटनेनंतर न घाबरता बेधडक पणे स्थानिक नागरिक बरोबर भारत एकता शांतता राहण्यासाठी प्रयत्न केले. तसेच स्थानिक लोकांच्याकडून मिळत असलेला पाठिंबा दहशतवादी हल्ल्यानंतर जनजीवन सुरळीतपणे करण्यासाठी मनोबल वाढविले. काश्मिरी नागरिकांसोबत भारतीय सैनिक दहशतवाद्यांविरोधात रस्त्यावर उतरलो. भारत माता की जय, टुरिस्ट हमारी जान है च्या सर्वधार्मियांच्या घोषणा करण्यात आल्या. पर्यटक व काश्मिरी नागरिक एकत्र येऊन परिस्थिती हाताळुया व पर्यटकांना सहकार्य करुयात. आपण सारे भारतीय हिंदू मुस्लिम भाई भाई असे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या स्वराज्य संघटनेचे विश्वासू शिलेदार तथा सरचिटणीस धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ पुजाताई मोरे/ जाधव यांनी केले. यावेळी सोशल मीडियावर शांततेचे आवाहन केले. तसेच जखमी ना रुग्णालयात दाखल करणे, दवाखान्यात जाऊन भेट देऊन मनोबल वाढविले आहे. या कार्यातून प्रेरणा देतदुसऱ्या प्रांतात जाऊन ही समाजसेवेचे कार्य करत आहेत हेच त्यांनी आपल्या या कार्यातून दाखवून दिले.
Back to top button