बीड

जामखेड पब्लिक स्कूल येथे ३९५ वी शिवजयंती साजरी

जामखेड पब्लिक स्कूल येथे ३९५ वी शिवजयंती साजरी

आजच्या पिढीला शिवछत्रपतींच्या विचारांची गरज – डॉ आण्णासाहेब मोहिते

जामखेड प्रतिनिधी -आजच्या पिढीला शिवछत्रपतींच्या इतिहासातील विचारांची गरज आहे.असे प्रतिपादन डॉ.आण्णासाहेब यांनी केले.
जामखेड शहरातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड पब्लिक स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. मोहिते म्हणाले की, शिवछत्रपतींनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून रयतेचे राज्य म्हणून स्वराज्याची स्थापना केली.राष्ट्रप्रेम व कर्तव्यनिष्ठा ठेवून महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अथक प्रयत्न केले.समाजातील स्त्रीचा आदर केला पाहिजे.आत्ताच्या विद्यार्थ्यांनी शाळा,शहर व आपल्या राष्ट्राबद्दल कर्तव्यनिष्ठा राहणे गरजेचे आहे. शालेय जीवनात मुले – मुलींना पालकांनी मोबाईल पासून दूर ठेवून व्यायाम, विविध खेळ व शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केले होते.या कार्यक्रमासाठी डॉ आण्णासाहेब मोहिते व दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार हे प्रमुख पाहुणे होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केले होते.या कार्यक्रमासाठी डॉ आण्णासाहेब मोहिते व दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार हे प्रमुख पाहुणे होते.
यावेळी प्राचार्य सुजित उबाळे,
सहशिक्षिका सौ.स्मिता डहाळे‌ ,सौ. रेश्मा चव्हाण,सौ.रुक्मिणी जिरेकर,सौ. वैशाली हजारे,सौ.भोगील ,सौ.कल्याणी सातपूते ,सौ. किर्ती सातपूते , सौ.आकांक्षा राळेभात, गणेश पुराणे सर, बालाजी खरात सर, राहुल पुलावळे, उज्ज्वला काकडे आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश पुराणे यांनी केले तर , आभार प्रदर्शन वैशाली हजारे यांनी मानले.

Back to top button