📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

डिलीव्हरी बॉयनं पार्सल घेणार्‍या 23 वर्षीय तरूणीला पाहून थेट केलं ‘हस्तमैथुन

 

आजकाल सर्वच ऑनलाइन शॉपिंगवर भर देत असतात तसेच काही जण काही ना काही ऑनलाईन वस्तू मागवत असतात. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधीही घरी येत असतात. अशाच एका घरात डिलिव्हरी बॉय रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी आला आणि घरात एका 23 वर्षीय तरुणीला पाहून त्याने आपल्या पॅटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले.

याप्रकरणी उंड्रीतील एका २३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोमान्ना फॅशन्स इंडिया कंपनीच्या डिलिव्हरी बॉय सतिश केंधले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुणीने एक्से पॅरिस ब्रॅड व्हाया रोमान्ना फॅशन्स इंडिया या कंपनीची लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती.

या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी करण्यासाठी १ डिसेबर रोजी रात्री पावणेदहा वाजता कंपनीचा डिलिव्हरी बॉय सतीश केंधले आला होता. त्याने आपल्या पँटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले. त्याची माहिती झाल्यावर फिर्यादी यांच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता त्याने ‘मी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा,’ असे बोलून फिर्यादीच्या आईला धमकीदिली. फिर्यादी यांनी त्याची कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button