📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळावे म्हणून शिवदास सोळंके यांचे सरस्वती धरणात आमरण उपोषण 

धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळावे म्हणून शिवदास सोळंके यांचे सरस्वती धरणात आमरण उपोषण
 दिंद्रुड (प्रतिनिधी ) दिंद्रुड पासून जवळच असलेल्या मोहखेड येथील सरस्वती प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांचे जमिनी संपादित करण्यात आल्या मावेजाही देण्यात आला मात्र धरणाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली स्वर्गीय भगवान बाजीराव सोळंके यांची जमीन संपादित झालीच नाही जमीन संपादित करून तात्काळ धरणग्रस्त प्रमाणपत्र देऊन मावेजा देण्यात यावा या मागणीसाठी शिवदास सोळंके यांनी सरस्वती धरणातच आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे
 शिवदास सोळंके यांनी पुढे बोलताना सांगितले की 1977 साली मोहखेड येथील गुणवंती प्रकल्पाची निर्मिती झाली यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती शेतकऱ्यांना सदर जमिनीचा मावेजा देण्यात येऊन धरणग्रस्त प्रमाणपत्राचे वितरणही झाले मात्र   स्वर्गीय भगवान बाजीराव सोळंके यांची स. नं :-30नवीन गट क्र 160 असा असून सदर जमीन धरणाच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याचे कळते असे असूनही सदर जमीन संपादित  झाल्याचे
 शासकीय रेकॉर्डला दिसून येत नाही करिता आमच्या स्वर्गीय आजोबाची जमीन शासनाने फेर संपादित यादी तयार करून जमीन संपादित करावी व आमच्या कुटुंबाला सदर जमिनीचा मावेजा मिळावा आणि व्हॅलिड धरणग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शिवदास सोळंके यांनी सरस्वती प्रकल्पातच आमरण उपोषणास आज पासून प्रारंभ केला आहे त्यांच्या या उपोषण आंदोलनास गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे त्यांच्या उपोषणासाठी सहकार्य म्हणून शेषराव सोळंके, अंतक पापा सोळंके आधी मित्रमंडळी उपोषण स्थळी बसून आहेत
Back to top button