बीड

अंबाजोगाई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग मुलांना Alimco साहित्य वाटप.

अंबाजोगाई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग मुलांना Alimco साहित्य वाटप.

*अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख* ;सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद बीड अंतर्गत गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती अंबाजोगाई येथे 0 ते 18 वर्षे वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोजमाप शिबिर अंतर्गत निश्चित केलेले साहित्य आज अंबाजोगाई नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री नंदकिशोर मुंदडा काकाजी, गटविकास अधिकारी श्री बळवंत साहेब, पोलीस निरीक्षक श्री जगताप साहेब . अधिष्ठाता श्री नितीन चाटे तसेच गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार, केंद्रप्रमुख श्री किर्दंत व समावेशित शिक्षण विभागातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षक व दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत एकूण 53 Alimco साहित्य वाटप करण्यात आले. गरजे नुरूप साहित्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हील चेअर, ट्रायसिकल,रोलेटर, ब्रेल किट, श्रवण यंत्र,स्मार्टफोन,TLM किट,CP चेअर, कुबड्या इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ज्या दिव्यांग मुलांकडे UDID प्रमाणपत्र आहे अशा विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण अंतर्गत मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, वाचक भत्ता, प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येतो तसेच फिजिओथेरपी, स्पीच थेरेपी वर्तन सुधार थेरेपी सुविधा देण्यात येतात. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या साह्याने दृष्टीदोष विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येतात.अशी माहिती विभाग प्रमुख श्री प्रकाश शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश काळे यांनी केले व आभार श्री महेश पवार यांनी मानले.

Back to top button