स्वतंत्र सेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालयात शिवजयंतीचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या भाषणांनी दुमदुमले महाविद्यालय.

स्वतंत्र सेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालयात शिवजयंतीचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या भाषणांनी दुमदुमले महाविद्यालय.
बीड: स्थानिक स्वतंत्र सेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालयात २१ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणायुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख अनिसुर रहमान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडेश्वरी शाळेचे मुख्याध्यापक कवचट सर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्यांनी शिवरायांचे न्यायदान आणि प्रशासन आजच्या विधिज्ञांसाठी आदर्श असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला वरिष्ठ प्राध्यापक अॅड. के. एस. पंडित, अॅड. एन. एन. साबळे यांच्यासह प्रा. हराळे, प्रा. पी. एम. मुळीक, प्रा. विठ्ठल मैंद, डॉ. गौरी नाईक ,प्रा. पार्थ कुलकर्णी, प्रा. पंकज तांदळे, प्रा. दिनेश जाधव, प्रा. महेश कानपाठक, प्रा. कपिल बेंद्रे, प्रा. सचिन मंदे, प्रा आशुतोष चोरमले, प्रा. मंगल जोगदंड, प्रा अक्षय महामुनी, आणि प्रा. विशाखा जाधव व इतर शिक्षक वृंद उपस्थित होता.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. LLB, BA LLB, DTL आणि LLM विभागातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणे केली. “शिवरायांचे विचार केवळ इतिहासात मर्यादित न ठेवता ते वर्तमानात अमलात आणणे हीच खरी जयंती,” असा सूर विद्यार्थ्यांनी लावून धरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. गणेश जोगदंड, मयूर नवले, दिलीप बच्चेवड नामदेव काशिद, दत्तात्रय निप्ते व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवगर्जना आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.



