नॅनो टेक्नोलॉजीच्या सहाय्याने विज्ञानाच्या संशोधनात भारत उत्क्रांती करत आहे ः प्रो.डॉ. भास्कर साठे

नॅनो टेक्नोलॉजीच्या सहाय्याने विज्ञानाच्या संशोधनात भारत उत्क्रांती करत आहे ः प्रो.डॉ. भास्कर साठे
सौ. के.एस.के. महाविद्यालयात रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न
बीड (प्रतिनिधी) ः येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने न्यू हॉरिझॉन इन केमिकल अँड फिजिकल सायन्सेस या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रो. डॉ. भास्कर साठे रसायनशास्त्र विभाग तथा नॅनो टेक्नोलॉजी विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व इतर शास्त्रातील संशोधनात नॅनो टेक्नोलॉजी च्या सहाय्याने भारत उत्क्रांती करत असून महत्वाचे संशोधनाचे कार्य संशोधकांच्या मदतीने आज होत असून मेडीकल फार्मास्युटिकल च्या माध्यमातून आपल्या देशात खुप मोठया प्रमाणात संशोधनात प्रगती करत असून त्याचा काही प्रमाणात पर्यावरणावर वाईट परीणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. रसायनशास्त्रातील संशोधनामध्ये आजघडीला नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण मानवाच्या शरीरातील हालचाली देखील कॅमेराच्या सहाय्याने सहज पाहु शकतो आणि त्यावर आवश्यक तेवढे उपचार देखील करु शकतो असे मत या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे यांनी ही परिषद रसायनशास्त्र व भौतिकशास्त्राच्या नव्या संशोधकांना उपयुक्त ठरणारी असून शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल. विज्ञानातील नवी क्षितीजे, नवतंत्रज्ञान, नवकल्पना यावर मंथन होईल. संशोधकांचे संशोधन वृत्तीला वाव मिळून हरीत तंत्रज्ञान ऊर्जा या संबंधाने या परिषदेत अभ्यासपुर्ण चर्चा होईल असे मत व्यक्त केले.
या परिषदेचे प्रमुख संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी या परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विविध विभागातील संशोधन केंद्र व त्यात होणारे संशोधन कार्य महत्वपुर्ण होत असून महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे संदर्भात महत्वपुर्ण माहिती दिली.
प्रमुख अतिथी डॉ. हुसेनी, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. ए.एस. खान, परिषदेचे समन्वयक डॉ. सतिष माऊलगे, डॉ. अशोक डोंगरे, प्रा. रुपेश कोकाटे, डॉ. लक्ष्मण गाडेकर यांच्यासह सहभागी संशोधक प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.



