जेष्ठ शिक्षक बाजीराव पवार यांचे निधन

जेष्ठ शिक्षक बाजीराव पवार यांचे निधन
जामखेड प्रतिनिधी- १० जूनआष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाजीराव पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते मूळचे एका संघर्षमय शेतकरी कुटुंबातून येत होते, आणि कठोर परिश्रम, चिकाटी व शिक्षणाच्या जोरावर त्यांनी मुख्याध्यापक पदापर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पार केला.पाटोदा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या १५ वर्ष संचालक पदावर त्यांनी काम पाहिले.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेली सेवा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात केलेले योगदान हे अमूल्य होते. त्यांच्या निधनाने अंमळनेर व जामखेड परिसरात शोककळा पसरली असून, एक प्रेरणादायी शिक्षक व मार्गदर्शक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी विमल बाजीराव पवार, मुलगा डॉ. प्रा. बाळासाहेब पवार, प्रताप बाजीराव पवार, मुलगी राजश्री बाजीराव पवार, सून शिक्षिका शुभांगी पवार, रोहिणी पवार,नातू सत्यजित पवार , शौर्य पवार व ५ नातू असा परिवार आहे.



