जामखेड तालुक्यात मुसळधार पाऊस; खर्डा, नदीकाठ गावांमध्ये प्रचंड नुकसान

जामखेड तालुक्यात मुसळधार पाऊस; खर्डा, नदीकाठ गावांमध्ये प्रचंड नुकसान
वंजारवाडी, धनेगावमध्ये पाणी शिरले;
जलजीवन योजनेची पाईपलाईन वाहून गेली
जामखेड प्रतिनिधी:जामखेड तालुक्यात रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. विशेषतः खर्डा भागात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून सर्व नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होत्या. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये मोठे नुकसान झाले.
एकमेव खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणलोट क्षेत्राच्या वरच्या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे वंजारवाडी गावात रात्री तीन वाजता पाणी शिरले. गावातील तरुणांनी जीव धोक्यात घालून जेष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. धनेगावमध्येही अशीच परिस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले तसेच खैरी प्रकल्प चे उपअभियंता गणेश काळे,सर्कल नंदकुमार गव्हाणे ,तलाठी केदार, ग्रामसेवक सचिन गदादे यांच्यासह सकाळी गावांना भेट देऊन मदत व दिलासा दिला.
सोनेगाव येथील केटी वेअर पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असल्याने बंधाऱ्याचे भराव वाहून गेले आणि जमिनींचे मोठे नुकसान झाले. तसेच, जलजीवन योजनेची पाईपलाईन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे गावाचा पाणीपुरवठा थांबला आहे.



