बीड

अवैध वाळू उत्खनन प्रकरणात पंचनाम्यावर आक्षेप; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

आष्टी (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील वडगाव परिसरातील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणात करण्यात आलेल्या पंचनाम्यावर गंभीर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वटणवाडी येथील रहिवासी महेश शांतिलाल नरवडे यांनी तहसीलदार कार्यालय, आष्टी येथे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वटणवाडी येथील नदीपात्रातील सर्वे क्रमांक 43/2 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. या बाबत त्यांनी यापूर्वी तहसीलदार कार्यालय तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला.
मात्र सदर पंचनामा करताना मंडळ अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्ष ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्याचे दिसत असतानाही पंचनाम्यात केवळ कमी प्रमाणात उत्खनन झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी सुमारे 30 ते 40 ब्रास वाळू उत्खनन झाले असल्याचे सांगितले जात असताना पंचनाम्यात मात्र केवळ 6 ते 8 ब्रास वाळू उत्खनन झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच संबंधित व्यक्तीने स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू उत्खनन केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हा पंचनामा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महेश नरवडे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात दि. 09 मार्च 2026 पर्यंत योग्य कारवाई करून दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास दि. 10 मार्च 2026 रोजी तहसीलदार कार्यालय, आष्टी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार महेश नरवडे यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
On Sat, 7 Mar 2026, 12:06 pm Manoj Pokale, <[email protected]> wrote:
अवैध वाळू उत्खनन प्रकरणात पंचनाम्यावर आक्षेप; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
आष्टी (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील वडगाव परिसरातील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणात करण्यात आलेल्या पंचनाम्यावर गंभीर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वटणवाडी येथील रहिवासी महेश शांतिलाल नरवडे यांनी तहसीलदार कार्यालय, आष्टी येथे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वटणवाडी येथील नदीपात्रातील सर्वे क्रमांक 43/2 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. या बाबत त्यांनी यापूर्वी तहसीलदार कार्यालय तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला.
मात्र सदर पंचनामा करताना मंडळ अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्ष ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्याचे दिसत असतानाही पंचनाम्यात केवळ कमी प्रमाणात उत्खनन झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी सुमारे 30 ते 40 ब्रास वाळू उत्खनन झाले असल्याचे सांगितले जात असताना पंचनाम्यात मात्र केवळ 6 ते 8 ब्रास वाळू उत्खनन झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच संबंधित व्यक्तीने स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू उत्खनन केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हा पंचनामा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महेश नरवडे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात दि. 10 मार्च 2026 पर्यंत योग्य कारवाई करून दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास दि. 20 मार्च 2026 रोजी तहसीलदार कार्यालय, आष्टी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार महेश नरवडे यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
Back to top button