बीड

तपनेश्वर शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

तपनेश्वर शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

जामखेड : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तपनेश्वर येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

‘यावेळी जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज तसेच पराक्रमी मावळ्यांच्या वेशभूषेत प्रभावी भाषणे सादर केली.लहानग्यांच्या दमदार सादरीकरणामुळे शाळा परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले.

प्रास्ताविकात शिक्षिका शितल कदम यांनी शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांची आठवण करून देत नव्या पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज पवार,मुख्याध्यापक प्रताप पवार,उपाध्यापिका शितल कदम,कल्पना मोरे,स्वाती गोरे यांच्यासह शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल कदम यांनी तर आभार स्वाती गोरे यांनी मानले.

Back to top button