बीड

शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकविम्यात  फसवले: – राजेंद्र आमटे 

शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकविम्यात  फसवले: – राजेंद्र आमटे
भाटसांगवी येथे आंदोलनासाठी शेतकरी बैठक
बीड (प्रतिनिधी) अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये हेक्टरी 17 हजार रुपये देऊ अशी घोषणा केली असताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमडीचा फायदाही सरकारने दिलेला नाही, तसेच निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून आश्वासन दिले असताना सरकारने कर्जमाफी मध्ये सातबारा कोरा केलेला नाही सरकारने शेतकऱ्याला पिक विमा व कर्जमाफीत फसवलेले आहे, असे प्रतिपादन शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केले.
      शेतकरी हक्क मोर्चा येत्या काही दिवसातच सरकारच्या विरोधामध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये अनुदान देऊ असे आश्वासन दिलेले असताना शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकरी हक्क मोर्चा लवकरच तीव्र आंदोलन करेल. यात शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने भाट सांगवी या गावांमध्ये शेतकरी जागृती अभियान व पुढील आंदोलनाची दिशा ठरवताना शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी हक्क मोर्चाच्या राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केले.
     भाटसांगवी येथे शेतकरी बैठकीमध्ये शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे कमलेश बोराडे, अंकुश बोरवडे, बिलास बोरवडे, गोवर्धन मस्के, दिगंबर चादर, सुभाष बोरुडे, राजाभाऊ सोनवणे, उद्धव बोरवडे, महेश सोनवणे, संदिपान सोनवणे, बाळू बोरवडे, समाधान मस्के, नारायण सोनवणे, मधुकर सोनवणे, नारायण बोरवडे ,बन्सी बोरुडे ,रवी सोनवणे, आदि शेतकरी उपस्थित होते.
Back to top button