📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मराठा सेवा संघ च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे “मराठा भूषण” पुरस्काराने सन्मानित

मराठा सेवा संघ च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे “मराठा भूषण” पुरस्काराने सन्मानित

बीड :- (दि.२२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ च्या वतीने दि.२० रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दिमाखदार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील प्रामाणिक व विशेष कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना “मराठा भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सुप्रसिद्ध व्याख्याते हनुमंत पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू बँक चे अध्यक्ष अजय पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे, विभागीय अध्यक्ष अशोक ठाकरे तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सन्मानपत्रात नमूद केल्याप्रमाणे, वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध निर्भीडपणे लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे आवाज उठवणे, सामाजिक जीवनात निष्कलंक चारित्र्य जपणे आणि तरुण पिढीसाठी दीपस्तंभ ठरणारे कार्य करणे या विशेष योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. ढवळे यांनी मनोगतात सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या कुटुंबीयांनी पाठीवर शाबासकीची थाप दिल्यासारखा आहे. हा सन्मान केवळ माझा नसून समाजहितासाठी अहोरात्र झटणाऱ्या सहकाऱ्यांचा आहे. अन्याय, भ्रष्टाचार व प्रशासकीय अनियमिततेविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी हा सन्मान अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.”
यावेळी चळवळीतील सहकारी रामनाथ खोड, माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले, पांडुरंग हराळे, डी.जी. तांदळे, धनंजय सानप, बाजीराव ढाकणे,राजकुमार कदम, अँड.करूणा टाकसाळ, कोमल मस्के, शिवमती वर्षा माने आदींची उपस्थिती होती.
Back to top button