बीड

सतीश दादा दाभाडे यांच्या चोख नियोजनाने श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सतीश दादा दाभाडे यांच्या चोख नियोजनाने श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
जय श्रीरामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमला , गेवराईत भव्य दिव्य शोभायात्रा
गेवराई प्रतिनिधी :-श्रीराम नवमी निमीत्त रविवार रोजी सायंकाळी शहरात सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमी निमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश दादा दाभाडे यांच्या चोख नियोजनाने श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशभरात श्रीरामनवमी मोठ्या उत्सव साजरी करण्यात येत असुन त्याच प्रमाणे सायंकाळी गेवराई शहरात श्रीराम नवमी निमित्त सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन ते मिरवणूक मार्गावरून सजवलेल्या रथातुन,भगवे ध्वज,ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश दाभाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Back to top button