मंगलम फुड अँड पार्क बीडकरांसाठी विरंगुळा स्पॉट.. राजेंद्र मस्के

मंगलम फुड अँड पार्क बीडकरांसाठी विरंगुळा स्पॉट.. राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी:-आज पालवण चहऱ्हाटा रोड, पालवण,येथे श्री विष्णू तात्या मस्के यांच्या मंगलम फुड ॲड पार्क नवीन उद्योगाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,इंजि. अजय अर्जुनराव पाटील,इंजि. अक्षय शिवाजीराव घोडके,प्रा. नारायणराव मस्के, सीए जाधव,बळीराम गवते, रावसाहेब मस्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
बीड शहरात मुलं बाळ सहपरिवार निवांत खेळ मनोरंजना साठी उद्यानांची उणीव आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगात मोबाईल मुळे माणसाच्या मुठीत जग आलं.परंतु माणसा माणसात दरी वाढली. मोठ्यांसह लहान मुले पूर्णतः मोबाईलच्या गर्तेतअडकले.सातत्याने मोबाईलच्या वापरा मुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. नवी पिढी खेळ गप्पा गोष्टी निसर्ग या पासून दूर चालली आहेत. आरोग्य आणि मानसिकते साठी हि बाब गंभीर ठरू शकते. लहान मुलांच्या बुद्धीवर शालेय अभ्यासक्रमांचा मोठा ताण आहे . कुटुंबाची जबाबदारी पेलताना महिला वर्गावर ही कायम तणावाची स्थिती असते. तणावग्रस्त मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात मुलांना बागडण्या साठी सर्व सोयी नियुक्त खुलं मैदान पाहिजे. ही सुविधा विष्णू मस्के यांनी बीड शहरा नजीक फुड अँड पार्क सुरू करून खऱ्या अर्थाने बीड करांची उणीव भरून काढली. मंगलम फूड अँड पार्क बीडकरांचा विरंगुळा स्पॉट ठरेल. अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिल्या.



