संपादकीय

शाळा सुरू करण्यासाठी महापालिका सज्ज, पालिका शांमध्ये होणार दोन दिवसात सॅनिटायझर फवारणी

 

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी जाणवू लागल्यामुळे राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसले तरी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे

तसेच दोन दिवसांत १,१५९ शाळांच्या सुमारे ५०० इमारतीमध्ये सॅनिटायझर फवारणी व शाळा स्वच्छता करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेनं कंबर कसली आहे. राज्यातील अनेक शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोना नियंत्रणात आल्याने ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी तर शहर भागात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र आता कोरोनाबाबतची सध्याची स्थिती व रुग्ण संख्या आदी बाबी पाहता इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार असल्याने विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. तसेच, हात धुण्यासाठी साबण आणि गेटवर स्क्रिंनगची व्यवस्थाही केली जाणार आहे. शाळेत सामाजिक अंतर राखण्यात येणार आहे. “कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.

Back to top button