📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आठवडी बाजार असतानाही लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिवसाच कुलुप ; रूग्णांची हेळसांड  :- डॉ.गणेश ढवळे

आठवडी बाजार असतानाही लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिवसाच कुलुप ; रूग्णांची हेळसांड  :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:-( दि.१३) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लिंबागणेश पंचक्रोशीतील १४-१५ गावातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोक आरोग्य सेवेच्या दृष्टीने अवलंबून आहेत. खाजगी दवाखान्याचा अवाजवी खर्च पेलु न शकणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आधार वाटतो. मात्र वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे रूग्णांची हेळसांड झाल्याचे दिसून येत आहे. आज दि.१३ गुरुवार रोजी लिंबागणेश येथील आठवडे बाजार असुनही दुपारीच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणी कक्षाला कुलुप आढळून आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत वाणी यांनी २-३ वेळा वैद्यकीय अधिकारी यांना फोन केला परंतु उचलण्यात आले नाही. तिसऱ्यांदा केलेला फोन उचलल्यानंतर मी बघते ,सांगते असं उत्तर वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी बीडहुन निघाल्याचे सांगितले. याचवेळी ज्येष्ठ नेते जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या शाळेवरील कर्मचाऱ्यांने विक्रांत वाणी यांना फोन करून वैद्यकीय अधिकारी जयदत्त आण्णांच्या जवळच्या असुन विषय वाढवु नका, बातमी करू नका असा अनाहुत सल्ला दिल्याचे विक्रांत वाणी यांनी सांगितले. रूग्णांनी पत्रकारांना समस्या सांगताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांने आकांडतांडव करत रूग्णांनाच ४ गोष्टी ऐकवल्या त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले भिवाबाई येडे, प्रमोद येडे, प्रमोद निर्मळ यांनी दवाखान्यात येऊन चिठ्ठी काढली आहे.परंतु डॉक्टरांचा पत्ताच नसल्याने नाराजी व्यक्त के
Back to top button