📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

स्वामी विवेकानंद अभ्यासिका जामखेड येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

स्वामी विवेकानंद अभ्यासिका जामखेड येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

जामखेड प्रतिनिधी;-स्वामी विवेकानंद अभ्यासिका मध्ये विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम करून स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले. असे प्रतिपादन जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले.

शहरातील जामखेड नगर परिषद शेजारी असलेले स्वामी विवेकानंद अभ्यासिका येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
या स्पर्धा स्पर्धेत अर्चना साखरे, श्रद्धा विटकर, प्रतिक्षा खाडे, सोनल फरांडे, युवराज घोडेस्वार यांची सहायक महसूल अधिकारी आणि अश्विनी डूचे व वैजिनाथ राऊत यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष व जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना साळवे म्हणाले की,स्पर्धा परीक्षा करत असताना अभ्यास करण्यासाठी नियोजन, तसेच कोणतेही काम मनापासून करा.

कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे न्यू इंग्लिश स्कूल हतोला या शाळेचे प्राचार्य साळवे डी एन यांनी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न  वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा मिळत असलेल्या बाबत समाधान व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद अभ्यासिका ची २०१६ मध्ये स्थापना झाल्यापासून तहसिलदार, पोलीस उपनिरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, सैनिक शिक्षक, क्लार्क पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. दिवसें -दिवस ही संख्या वाढत आहे अशी माहिती संचालक प्रा सोमनाथ शिंदे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे बी. एस. सर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा सोमनाथ शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ हळनोर यांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्याची गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

Back to top button