महात्मा बसवेश्वर यांची जयंती ना.पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात साजरी

महात्मा बसवेश्वर यांची जयंती ना.पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात साजरी
समाजसुधारक बसवेश्वरांचे विचार व नितीमुल्यांचा संदेश नव्या पिढी पर्यंत पोहोंचवा – सौ.उमाताई समशेट्टी
परळी / प्रतिनिधी:-जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशु संवर्धन मंञी ना. पंकजाताई मुंडे यांचे संपर्क कार्यालय, परळी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जगतगुरु महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचीत शहरअध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी व दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भाजप शहराध्यक्षा सौ.समशेट्टी यांनी बसवेश्वरांनी दिलेला कर्मयोग, सर्वधर्मसमभाव व नीतिमूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, सत्य, अहिंसा आणि समानतेचा मार्ग दाखवणारे आणि कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा संगम म्हणजे जगतगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या शिकवणीचा आदर्श आपण सर्वांनी डोळयासमोर ठेवुन वाटचाल करुया आणि जगतगुरुंना वंदन करुया. यावेळी महादेव ईटके, प्रशांत कराड यांनी महात्मा बसवेश्वरांच्या सामाजिक समता, बंधुता आणि कार्यक्षम प्रशासनाच्या विचारांचा उजाळा घेतला.
*नवनिर्वाचित शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टी यांचा सत्कार*
मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच भाजप परळी शहराध्यक्ष म्हणून सौ. समशेट्टी यांची निवड केली आहे. यामुळे शहर भाजपच्या वतीने ना.पंकजाताई मुंडे यांचे संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सौ.समशेट्टी यांचा सत्कार करुन पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात युवक आणि महिला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली.
या कार्यक्रमास भाजपचे सर्वश्री राजेंद्र ओझा, नितीन समशेट्टी, विकास हालगे, बंडुनाना कोरे, अनिश अग्रवाल, नरेश पिंपळे, दिलीप नेहरकर, पवन तोडकरी, सुशिल हरंगुळे, योगेश मुंडे, विराज गित्ते, महिला आघाडीच्या सारीका कुरील, दत्ता गोपनपाळे, श्रीपाद शिंदे, मिलिंद कांबळे, वनमाला ताटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन विकास हालगे यांनी केले तर आभार प्रशांत कराड यांनी मानले.



