📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

अनिल देशमुखांची १४ दिवस न्यायालयीन कोठडी, आर्थर रोड कारागृहात रवानगी;

 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह त्यांनी १०० कोटी हप्ता वसुलीच्या आरोपांवरून पदाचा राजीनामा दिलेले माजी गृहमंत्री आणि रास्तवराडीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यातच आता देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

२९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती. यावर दोन्ही बाजूंच्या वकीलांनी आपापली बाजू मांडल्यानंतर कोर्टाकडून देशमुखांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीये.

अनिल देशमुखांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. ईडीच्या तब्यात असलेल्या देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडने निर्देश दिले आहेत.

Back to top button