भक्तीशक्तीच्या जागरात शरद पवारांचा ८५ वा वाढदिवस साजरा

भक्तीशक्तीच्या जागरात शरद पवारांचा ८५ वा वाढदिवस साजरा
डिसलेवाडी येथे कीर्तन व स्नेहभोजनाचा उत्साहात कार्यक्रम
जामखेड प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार शरदचंद्रजी गोविंदराव पवार यांचा ८५ वा वाढदिवस जामखेड तालुक्यातील डिसलेवाडी (खांडवी) येथे जागर–भक्तीशक्तीच्या कीर्तन आणि स्नेहभोजन कार्यक्रमात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी ह.भ.प. राजेंद्र (महाराज) जमदाडे यांनी कीर्तन सादर करून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि भक्तीचा संदेश दिला. तसेच ह.भ.प. सुरसे (महाराज), ह.भ.प. मडके महाराज, ह.भ.प. वाकळे महाराज, ह.भ.प. बाळासाहेब गाडे (महाराज) यांचीही उपस्थिती लाभली.
कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी प्रसाद व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. शांततापूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र पवार, विजयसिंह गोलेकर, प्रा. संजय वराट, नरेंद्र जाधव, डॉ. कैलास हजारे, रामहरी गोपाळघरे, बबन तुपेरे, हनुमंत भोसले, सचिन भोसले, दीपक नेटके, गोकुळ नेटके, प्रदीप धुमाळ, बाप्पू वाळुंजकर, महादेव मेंगडे, महादेव डिसले, अरुण गाडे, संतोष ढवळे, निलेश पवार, राहुल कवादे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
हा उपक्रम माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. सामाजिक सलोखा जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत निकम (महाराज) यांनी केले तर आभारप्रदर्शन बापूसाहेब कार्ले यांनी मानले.



