बीड

आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून बीडमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र

आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून बीडमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र
नसबंदी व लसीकरण मोहिमेसाठी ५० लाखांचा निधी मंजूर
बीड : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नातून बीड शहरात मोकाट कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्यात येणार असून नसबंदी व लसीकरण मोहिमेसाठी तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील धानोरा रोडवरील पांढरी नाका परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर, नागरिकांवर हल्ल्याच्या घटना तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला होता.
या पार्श्वभूमीवर राजीव गांधी चौक परिसरात मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रामध्ये कुत्र्यांची योग्य देखभाल, वैद्यकीय उपचार, नसबंदी आणि लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Back to top button