बीड

मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जयभवानीचा संघ विजेता

मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जयभवानीचा संघ विजेता

माध्यमिक विद्यालय घोगस पारगावचा संघ ठरला उपविजेता
===============
गेवराई दि.२९ (प्रतिनिधी) शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या शारदा क्रिडा महोत्सवात मुलींच्या गटात झालेल्या कबड्डी स्पर्धेत गढी येथील जयभवानी विद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद  माध्यमिक विद्यालय विद्यालय घोगस पारगावच्या संघाने पटकावले तर शिवाजी  विद्यालय मालेगावचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. यावेळी शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, समाधान मस्के यांच्यासह मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरु असलेल्या शारदा क्रिडा महोत्सवात मुलींच्या गटात कबड्डी स्पर्धा गेवराई येथील शारदा विद्या मंदिराच्या मैदानावर झाल्या. दिवसभर झालेल्या साखळी सामन्या नंतर अंतिम सामन्यात गढी  येथील जयभवानी विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेते पद पटकावले. संघाची कप्तान ज्ञानेश्वरी शिंदे हिच्या नेतृत्वाखाली गोकुळ श्रुती, राठोड निशा, पवार संध्या, बोर्ड शिवानी, जाधव प्राची, चव्हाण निकिता,  केकान सुप्रिया, कांडेकर गौरी, धोत्रे सिद्धी, कादे सखू, वायभट गीता या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केली. संघाला मुख्याध्यापक व्हि.पी. राठोड, क्रिडा शिक्षक गणपत डोंगरे, दिलीप धस , विजयकुमार अपशिंगेकर, आकाश आडे, नितीन पांढरे, दादा तळेकर, भगवान शिंदे, रमेश देशमुख चंद्रकांत पवार, ओम मोटे, सुमेर सय्यद, श्रीमती सुरेखा सुदेवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

कबड्डी स्पर्धेचे उपविजेतेपद  माध्यमिक विद्यालय घोगस पारगावच्या संघाने मिळवले. संघातील ज्योती गर्कळ, तनुजा गर्कळ, पुजा वारे, धनश्री गर्कळ,रुपाली गर्कळ,भक्ती गर्कळ, आरती डोंगरे, सुमित्रा गर्जे, ज्ञानेश्वरी दराडे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. संघाला मुख्याध्यापक रणजित सानप यांच्यासह आत्माराम शिंगाडे, विजय कर्नेवाड, धर्मराज खेडकर, सोमेश्वर पाटेकर, बंडू जरांगे, कृष्णा खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी विद्यालय मालेगावच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

विजेत्यांना लवकरच एका  कार्यक्रमात पारितोषिके देण्यात येतील असे आयोजक रणवीर पंडित यांनी यावेळी सांगितले. कबड्डी स्पर्धेचे पंच म्हणून डॉ .केतन गायकवाड, शुभम कादे, बाळू आडे, गणेश यादव, आकाश राठोड, ज्ञानेश्वर धापसे, सिद्धू माने, हर्षद गावंडे, हर्षद माने, रोहन लोणे, सुदीप डाके यांनी काम पहिले. यावेळी संस्थेतील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Back to top button