बीड

अग्नि भडकला तर तो नियंत्रणात आणणे हे अशक्यप्राय ठरते -साध्वी प्रतिभाजी म.सा. यांचे प्रतिपादन

अग्नि भडकला तर तो नियंत्रणात आणणे हे अशक्यप्राय ठरते -साध्वी प्रतिभाजी म.सा. यांचे प्रतिपादन

तेरापंथ स्वाध्याय भवन गुजराती कॉलनी येथे दि.26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 प्रवचनमाला

बीड (प्रतिनिधी):- अग्नि भडकला तर तो नियंत्रणात आणणे हे अशक्यप्राय ठरते असे प्रतिपादन साध्वी प्रतिभाजी म.सा यांनी केले. त्या बीड येथील तेरापंथ स्वाध्याय भवन गुजराती कॉलनी येथील प्रवचनमाले दरम्यान केले. त्या पारगाव तालुका वाशी येथील नवनिर्मित जैन स्थानकाच्या उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोठा संप्रदाय प्रमुख महाराष्ट्र प्रवर्तनी पूज्य श्री प्रतिभा कवरजी महाराज या आपल्या चार साध्वी वृंदासह जात असताना, जैन धर्मियांचे मोठे क्षेत्र असणार्‍या बीडकरांच्या विनंतीला मान देवून दि.26 डिसेंबर 2025 रोजी बीड त्यांचे येथे आगमन झाले. यावेळी समाज बांधवांच्यावतीने त्यांचे बीड नगरीत उत्साहात स्वागत केले.
यावेळी प्रवचनमालेत बोलतांना साध्वी प्रतिभाजी म.सा. म्हणाल्या की, हिंदू व जैन संस्कृतीमध्ये नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदा हे शालीवाहन शके तर कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे विक्रम संवत म्हणून मराठी दिनदर्शिकावरून सुरू होतात. मात्र पश्चिमात्य संस्कृतीच्या अधीन आपण गेल्यामुळे या वर्षाअखेर आपण अमंगलरित्या आनंद साजरा करतो. त्यानुसारच आपल्यावर पडलेल्या त्यांच्या प्रभावाने आपण याच दिवसाला वर्ष समजून त्यांचे रितीरिवाज पाळतो. या दृष्टिकोनातून नवीन लागणारे वर्ष हे आपणास  सौख्य, संपन्नता, वैभवात जावो यासाठी मंगल कामना करतो. कारण पुढील नववर्षातून चांगले करण्याचा त्याचा मानस असतो, त्यासाठी साधुसंताचा आशीर्वाद मिळाला तर तो समाधानाचा ठरतो.
दि.26 डिसेंबर रोजी तेरा पंथ स्वाध्याय भुवन येथे बोलताना त्या म्हणाल्या या भौतिक सुखातील संसाराच्या व्यापात परमेश्वर कोठे आहे? याला आपण विसरलेलो आहोत. आपण मात्र दुःखाच्या वेळी याच परमेश्वराची आराधना करतो. ज्याप्रमाणे सकाळी प्रार्थने नंतर परमेश्वरापुढे नंदादीप लावून तो नंदादीप प्रज्वलित राहावा म्हणून वार्‍यापासून त्याचे संरक्षण करतो, तोच हा वारा ज्यावेळी कापसाच्या गंजीला लागलेल्या अग्नीला स्पर्श करतो त्यावेळी तो भडकतो आणि त्याला नियंत्रणात आणणे अशक्यप्राय बनते. असेच माणसाच्या जीवनात ज्यावेळी तो सुखाग्णीने भडकलेला असतो त्यावेळी तो इतर कोणाचाही विचार न करता आपले आयुष्य विनाशाकडे घेऊन जातो. परंतु ज्यावेळी अडचणीत येतो त्यावेळी परमेश्वराची आराधना करून त्याच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतो. जसा दिव्याला कुठल्या हवेचा त्रास होऊ नये म्हणून सुरक्षित केले जाते तद्वतच त्याला कळते इतर वाम मार्गाने न जाता आपण आपल्या आयुष्याचे चिंतन हे परमेश्वराच्या नामस्मरणाने करावे. आणि या सुखी संसाराचा पुरुषार्थ करुन धैर्याची हिम्मत बांधून आपले कार्य साधावे. यातच मानवाचे हित आहे असे सांगतांना साध्वीजी म्हणाल्या, आपल्या अंगी समजदारी, इमानदारी व जबाबदारी या गुणांचा अवलंब करावा असाही उपदेश त्यांनी उपस्थितांना केला. प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी 8.45 ते 9.45 या वेळेत तेरापंथ स्वाध्याय भवन गुजराती कॉलनी येथे दि.26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 पर्यंत सुरु असून याचा श्रावक-श्राविकांनी घ्यावा असे अवाहन समाज बांधवांच्या करण्यात आले आहे.

Back to top button