📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कु.कायरा हिचा वाढदिवस बिहार येथील भारती कुटुबांने अनाथ, निराधार, मुलांमध्ये केला साजरा …..

कु.कायरा हिचा वाढदिवस बिहार येथील भारती कुटुबांने अनाथ, निराधार, मुलांमध्ये केला साजरा …..

जामखेड प्रतिनिधी: दिनांक 10/12/ 2025 बिहार येथील मा. कुणाल भारती साहेब जामखेड तालुक्यातील चालू असलेल्या रस्त्याचे कन्सल्टन्सी सिविल इंजिनियर (Ekam Venture) यांनी आपल्या कायरा मुलीचा वाढदिवस इतर ठिकाणी जाऊन खर्च न करता ज्यांना कोणी नाही त्यांना मदतीची गरज आहे, आशा निवारा बालगृहातील अनाथ, निराधार मुलांमध्ये येऊन वाढदिवस साजरा केला.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहिल्यानगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी घटकातील 96 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी गेले 10 वर्षापासून हा प्रकल्प चालवला जातो या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नसून हे बालगृह संपूर्णपणे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून व लोकवर्गणीतून चालवले जात आहे,
बालगृहाच्या वतीने कुणाल भारती साहेब व त्यांच्या फॅमिलीचे शाल गुलाब गुच्छ देऊन जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केले,त्यांनी निवारा बालगृहातील मुलांना एक वेळचे गोड अन्नदान दिले तसेच बालगृहातून शाळेत जाणाऱ्या रस्त्याचे कामही केले व कायमस्वरूपी आठवण राहील म्हणून 21 जांभळीचे झाडे देऊन आपल्या कायरा मुलीचा वाढदिवस अनाथ निराधारामध्ये साजरा करून मुलांना एक आगळावेगळा आनंद दिला,
यावेळी बोलताना कुणाल भारती साहेब म्हणाले की निवारा बालगृहात आल्यानंतर मुलांची शिक्षणाची तयारी निवार्‍या मधील स्वच्छता आणि संस्थेचे प्रगती बघून मला या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटले व तुम्ही जे या गोरगरिबांसाठी काम करतात त्याचे मोल कशातच करता येणार नाही,ज्या मुलांना आई-बाबा माहित नाहीत त्या मुलांचे आई-बाबा होण्याचे काम तुम्ही करतात. तुमच्या कार्याला मी सलाम…
या बालगृहात शिकणाऱ्या मुलांनी मोठे होऊन चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनावे पुढील काळामध्ये बालगृहातील मुलांना शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती मदत करायला मी तयार आहे.बालगृहाच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या,
संस्थेची संपूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी दिली यावेळी सतीश चिपळूणकर,शिलादित्य मंडल , सत्यम चौधरी, नरेंद्र गंगोळे, वसंत झीनेपाटील, सुमन चौधरी, गुलाब मदने, अधिक्षक वैजीनाथ केसकर सर, संतोष चव्हाण सर, तुकाराम शिंदे सर, सौ.संगीता केसकर व विद्यार्थी उपस्थित होते

Back to top button