बीड
आम आदमी पार्टीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती बैठक संपन्न

आम आदमी पार्टीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती बैठक संपन्न
बीड : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांचा आढावा तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी यासाठी आम आदमी पार्टीतर्फे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विशेष मंथन बैठक हॉटेल बालाजी, शाहूनगर, सम्राट चौक, पांगरी रोड, बीड येथे घेण्यात आली.
या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीत सहभागी झालेले उमेदवार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मागील निवडणुकांचे विश्लेषण करण्यात आले तसेच आगामी निवडणुकांमध्ये अधिक प्रभावी कामगिरी करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा एकमुखाने निर्धार व्यक्त केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीसह शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर आधारित विचारसरणीला आधार मानून गावोगावी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष सय्यद सादेक, तालुकाध्यक्ष कृष्णाजी जगताप, तालुका उपाध्यक्ष अजम खान, अॅड. पूजा अडाणे, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ, कैलास पालीवाल, रामभाऊजी शेरकर, माऊली शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



