📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘जनजाती गौरव दिन’ साजरा

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘जनजाती गौरव दिन’ साजरा
लिंबागणेश :– (दि. १५)
क्रांतिकारक, समाजसुधारक, पर्यावरणसंरक्षक आणि आदिवासी समाजाचे शाश्वत प्रेरणस्त्रोत जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शासन आदेशानुसार १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजाती गौरव पंधरवडा’ राबविण्यात आला.
आज दि. १५ रोजी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिक्षण, कौशल्य विकास, कला, संस्कृती आणि वारसा या विषयांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शाळेमध्ये वारली चित्रकला स्पर्धा, आदिवासी वेशभूषा स्पर्धा, तसेच आदिवासी नृत्य या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आदिवासी नृत्यात अल्विना अझिम सय्यद, शिवकन्या अंकुश थोरात, रोशनी भारत मुळीक, कार्तिकी शहादेव थोरात, भाग्यश्री बालु थोरात यांनी सहभाग घेतला.
आदिवासी वेशभूषेत शिवराज गणेश वायभट, राजवीर महावीर जाधव, शंभू कृष्णा रणखांब, शहानवाज शौकत तांबोळी, सार्थ परमेश्वर रणखांब, तौफीक फिरोज तांबोळी यांनी आकर्षक सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक दिपक घाटे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, तसेच पत्रकार हरिओम क्षीरसागर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती गिते, श्रीमती अयाचित, श्रीमती सानप यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले की,
“बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी नव्हे तर संपूर्ण भारताच्या सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या चळवळीचे प्रतीक आहेत. अवघ्या २५ वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी ब्रिटिश सत्तेला हादरा देत आदिवासी समाजात हक्क, संघटन, स्वाभिमान आणि पर्यावरण संरक्षणाची जाज्वल्य जाणीव निर्माण केली.”
ब्रिटीश सत्तेने झारखंड, ओडिशा, बिहार परिसरातील आदिवासींवर केलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी “आपली जमीन – आपलं राज्य” हा संघर्ष उभारला, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
—
Back to top button