बीड

गढी महाविद्यालयात स्वच्छ्योत्सव उपक्रम संपन्न

गढी महाविद्यालयात स्वच्छ्योत्सव उपक्रम संपन्न
प्रतिनिधी गढी- जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, गेवराई  संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशांनुसार दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 हा पंधरवाडा ‘स्वच्छता ही सेवा अभियान 2025’ म्हणून देशभर साजरा केला जात आहे. या अभियानातील एक उपक्रम म्हणून स्वच्छयोत्सव अंतर्गत  महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.  स्वच्छ्योत्सवमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सदाशिव सरकटे यांनी स्वच्छते महत्त्व प्रतिपादन केले. स्वच्छता ही आपल्या जीवनाची सवय झाली पाहिजे. आसंही त्यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाध्यकारी प्रा. डॉ.जयराम ढवळे व प्रा. डॉ.राणी जाधव यांनी पुढाकार घेतला.
             यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संतोषकुमार यशवंतकर, प्रा.डॉ. रमेश रिंगणे, प्रा. डॉ.कलंदर पठाण, प्रा डॉ.बाळासाहेब सरपते,प्रा. डॉ. रामहरी फाटक, प्रा. डॉ. शिवलाल घुगे, प्रा.डॉ.तबस्सूम  इनामदार,  प्रा.हिरा पोटकुले,प्रा डॉ. महादेवी फड, प्रा. शिल्पा ससाने,प्रा. डॉ. रामदास खताळ, प्रा. डॉ. धर्मराज कटके, ग्रंथपाल डॉ. महारुद्र गव्हाणे,प्रा सुप्रिया डोंगरे प्रा. अजित काळे, प्रा. अनिल गोंजारे,  श्री. राजेंद्र जाधव, श्री. शाम राऊत, श्री. अमर जाधव, श्री. मधुकर धुताडमाल, श्री. कल्याण वक्ते, श्री. अशोक कांबळे यांच्यासह  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक  बहुसंख्येने उपस्थिती होते.
Back to top button