बीड

गणेशोत्सव निमित्त  लिंबागणेश येथे पोलिसांचे पथसंचल —

गणेशोत्सव निमित्त  लिंबागणेश येथे पोलिसांचे पथसंचल
लिंबागणेश (दि.१):बीड तालुक्यातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावनभूमीत मयुरेश्वर गणरायाची प्रतिष्ठापना सरकार वाड्यात मोठ्या श्रद्धा–उत्साहात करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत व सहाय्यक पोलीस अधीक्षक (उपविभाग केज) ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेकनुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१) सोमवार रोजी सायंकाळी लिंबागणेश येथे पथसंचलन पार पडले.
📍 पथसंचलनास सुरुवात पोलीस चौकी येथून होऊन → बस स्थानक → हनुमान चौक → वाणी चौक → ढवळे चौक → सरकार वाडा असा मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस चौकी येथे सांगता झाली.
या पथसंचलनात पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, पद्माकर आहेर, सपो. लक्ष्मण बीडकर, बाबासाहेब राख, गोविंद बडे, पोह. विशाल क्षीरसागर, अविनाश घुंगरट, सतिश राऊत, खाडे, बाळासाहेब ढाकणे, खाडे यांच्यासह एकूण ३० पोलीस कर्मचारी व ३० होमगार्ड सहभागी झाले होते.
👉 गणेशोत्सव काळात मूर्ती प्रतिष्ठापनेपासून ते गणेश विसर्जनापर्यंत कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
Back to top button