📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

संदीपान साबळेची हवाई दलात निवड

संदीपान साबळेची हवाई दलात निवड
शिरूरकासार दि.१६ (प्रतिनिधी): तालुक्यातील मालकाचीवाडी येथील संदीपान साबळे याची भारतीय हवाई दल ज्युनियर एअर ट्रॅफिक कंट्रोलरपदी नियुक्ती झाली असून गोंदिया येथे प्रशिक्षण पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
     शिरूरकासार तालुक्यातील डोंगर पट्ट्यात असणारे मालकाचीवाडी या गावात सामान्य शेतकरी कुटुंबात संदीपान याचा जन्म झाला. गावातीलच जिल्हापरिषदेच्या शाळेत तसेच भामेश्वर विद्यालय पाटोदा येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतले.पुढे बीटेक,आयआय.टी असे शिक्षक घेत वाराणसी भारतीय हवाई दल ज्युनियर एअर ट्रॅफिक कंट्रोलर पदी नियुक्ती झाल्यांनतर गोंदिया येथे आठ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा (सहारा) मुंबई येथे नेमणूक मिळाली असून सर्व स्तरावरून त्याचे अभिनंदन होत आहे.
Back to top button