बीड

उपशिक्षणाधिकारी मोदानी यांची जिल्हा परिषद लोणीघाट शाळेस भेट

उपशिक्षणाधिकारी मोदानी यांची जिल्हा परिषद लोणीघाट शाळेस भेट
बीड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री.एम. एच. मोदानी यांनी आज हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत शाळा तपासणी निमित्ताने आकस्मिक भेट दिली असता शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्रत्येक वर्गात जाऊन तपासली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दिलेली उत्तरे पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले. शाळेतील सर्व लहान सहान गोष्टींचे निरीक्षण केले. यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्र कन्या चौसाळाचे मुख्याध्यापक श्री. अशोकराव जाधव सर उपस्थित होते तर केंद्रप्रमुख शंकर पाटील सर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आदर्श शिक्षक तुकाराम सपाटे सर, रत्नमाला जोगदंड मॅडम, अर्चना पन्हाळे मोरे मॅडम, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शितल जाधव मॅडम यांच्यासह आप्पासाहेब सुरवसे सर लाखनगावकर उपस्थित होते.
यावेळी शालेय अभिलेखे, PAT परीक्षा वर्गनिहाय पेपर तपासणी, गुणदान लेखी तोंडी परीक्षा बाबतीचे नियोजन, विद्यार्थी संचिका, प्रकल्प -उपक्रम तसेच विद्यार्थी गृहपाठ, शालेय पोषण आहार अभिलेखे सूक्ष्मपणे तपासण्यात आले. हर घर तिरंगा उपक्रम मोहिमे अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त होत असलेल्या कवायती प्रात्यक्षिक संचलन, भाषण-वक्तृत्व सह विविध उपक्रमांची रंगीत तालीम पाहिली. विशेषतः विद्यार्थी प्रवेश निर्गम रजिस्टर अगदी आजपावेतो आद्ययवत असल्याबद्दल उत्कृष्ट शेरा देत कामाची स्तुती करत अभिनंदन केले.
      मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत शालेय पोषण आहार मेन्यूप्रमाणे शिजवलेल्या सोयाबीन पुलाव- स्पेशल परसबागेतील शेवगाच्या झाडाला लागलेल्या शेंगांची आमटी-भाजी बनवण्यात आली होती. त्याची देखील चव घेऊन एकंदरीत टीम वर्क अफलातून असल्याचे साहेबांनी सांगितले. शाळेत लावलेल्या आंब्यांच्या, नारळाची, सिताफळ, जांभळ, लिंबोणी इत्यादी फळझाडांची तसेच परस बागेची देखील पाहणी केली. सत्कार प्रसंगी श्रीफळ म्हणून शाळेतील नारळाच्या झाडाचे नारळ देऊन सन्मान केल्यामुळे मोदानी साहेब भारावून गेले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री. शंकर पाटील यांनी तर सूत्रसंचालन श्री. आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर  यांनी तर आभारप्रदर्शन तुकाराम सपाटे यांनी मानले.
Back to top button