जामखेड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा.

.जामखेड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा.
जामखेड प्रतिनिधी – जामखेड महाविद्यालयातील एन.एन.एस विभाग आणि आर. आर.सी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. पुराणे एस. जी होते. प्रमुख मार्गदर्शक मा.श्रीमती कांबळे मॅडम,
प्रा फलके ए.बी (कला शाखाप्रमुख), डॉ. देशपांडे आर. के (सांस्कृतिक विभाग प्रमुख) डॉ . केळकर जी. डी.( एन. सी. सी. विभागप्रमुख), प्रा. या डॉ गौरव मस्के (विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी), डॉ . मोहिते ए. डी (क्रीडा संचालक), प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती कांबळे मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवसाच्या संदर्भात बोलत असताना युवकाने नेहमी निर्व्यसनी, संयमी, अभ्यासू असावे, तसेच संघर्ष करण्याची धमक त्याच्या जवळ असावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. पुराणे एस.जी यांनी युवकाने स्वामी विवेकानंद यांच्या विचारातील युवकाप्रमाणे आपल्या जीवनात आदर्श तत्वज्ञान समोर ठेवून आचरण करावे. आपला शैक्षणिक आणि सामाजिक विकास करून घ्यावा.असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौरव मस्के यांनी केले
आभार प्रा. अडाले मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सय्यद मॅडम यांनी केले. छायांकन प्रा. महारनवर डी. एस यांनी केले.
या कार्यक्रमांसाठी प्रा.मोहळकर एस. डी, प्रा भाकरे आर. ए, प्रा. कांबळे आर .एस, प्रा. विशाल रेडे आदींचे सहकार्य लाभले.



