बीड

प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस ; समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस – प्रा.राम शिंदे

प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस ; समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस – प्रा.राम शिंदे

प्रा.मधुकर राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

जामखेड – प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस असून मनात ‘सेवानिवृत्ती’ हा शब्दच नाही. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते आणखी जोमाने कार्यरत राहतील. लोकाभिमुख कामांना अधिक गती देतील, असा मला विश्वास आहे,अशी भावना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
ते जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव, चेअरमन आजिनाथ हजारे,प्राचार्य विकी घायतडक,माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर,माजी जिल्हा परिषद सदस्य पै. प्रविण घुले,राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय वारे, बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले,उपसभापती नंदकुमार गोरे, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले,माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, रवि सुरवसे, मनोज कुलकर्णी, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, भाजपा शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद, बापुराव ढवळे, बाजीराव गोपाळघरे, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर काझी,आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, सरपंच संजिवनी पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संध्या सोनवणे, दादासाहेब रिटे, युवा नेते राहुल उगले, युवा उद्योजक आकाश बाफना, मोहन गडदे, गणेश डोंगरे, राहुल बेदमुथ्था, वैजिनाथ पाटील, कॅप्टन लक्ष्मण भोरे,जमीर सय्यद, प्रशांत शिंदे, गफ्फार पठाण, ॲड.महारुद्र नागरगोजे, प्रविण सानप, हर्षल डोके, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, बापूसाहेब शिंदे, मौलाना खलील, मुख्तार सय्यद, इस्माईल सय्यद, इम्रान कुरेशी, शिक्षक नेते राम निकम, लेखक एकनाथ चव्हाण,आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच व्यापारी क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, प्रा. मधुकर राळेभात आणि मी पूर्वी प्राध्यापक होतो. जरी आमचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी आमच्या राजकीय दृष्टीने वैचारिक समानता होती. २००९ साली विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभे राहिल्यावर त्यांनी जामखेड तालुक्यातून तीन हजाराहून अधिक मत मिळवले, जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शेतकरी कल्याण या सर्वच क्षेत्रांत प्रभावी योगदान दिले. प्रा.मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे.त्यांचा जनसंपर्क मोठा असून त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसाला आले आहेत.भिन्न विचारांचे लोक एकत्र आलेत, म्हणूनच जुळणीचा नेता म्हणून प्रा.राळेभात हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.प्रा.मधुकर राळेभात यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यासाठी मिळवलेले हे पद अत्यंत अभिमानास्पद आहे. इतकं मोठं पद मिळेल असं कधीच वाटले नव्हतं, पण त्यांनी ते समजदारीने आणि चिकाटीने मिळवले आहे. समाजकारण करताना लोकांच्या अडचणी लक्षात घेणं गरजेचं असून, समाज आणि लोकव्यवस्था टिकवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.मी राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रांना नेहमीच वेळेला प्राधान्य दिलं आहे. वेळेचं महत्त्व ओळखणारा माणूसच खरंच सुखी आणि यशस्वी होतो, असंही ते म्हणाले. या यशामागे माझ्या पत्नीचं मोठं सहकार्य आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद,डॉ.भगवान मुरूमकर, ॲड. डॉ. अरुण जाधव, दत्तात्रय वारे, रवि सुरवसे, अजहर काझी, संजिवनी पाटील, संध्या सोनवणे,प्रा.सुनील नारके,प्राचार्य विकी घायतडक, मौलाना खलील,आकाश बाफना आदींनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान तसेच २१० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व श्री नागेश्वर मंदिर येथील सेवा समितीच्या माता भगिनींना साडी वाटप करण्यात आले. तालुक्यातील खर्डा येथे ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी प्रा. राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

युवा नेते अण्णासाहेब ढवळे यांच्या वतीने कान्होपात्रानगर येथील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तपनेश्वर येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. उद्योजक महेश आजबे यांच्या वतीने शहरातील जमादारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेटके वस्ति व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जमादारवाडी येथील विद्यार्थ्यांना जेवणासाठी टिफिनचे वाटप करण्यात आले.

अशा विविध उपक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक अमित जाधव,दिगांबर चव्हाण,मोहन पवार,पवन राळेभात,अवधूत पवार, महालिंग कोरे,पिंटूशेठ बोरा,विनायक राऊत,दिपक खेडकर,सुधीर पवार,ॲड. अमृत राळेभात,लखन राळेभात, भरत राळेभात,नागार्जुन राळेभात,बाळु मोहिते आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जाकीर शेख यांनी केले, सूत्रसंचालन हनुमंत निकम (महाराज) यांनी केले तर आभारप्रदर्शन अमित जाधव यांनी मानले.

Back to top button