श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात पालक शिक्षक संघाची स्थापना

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात पालक शिक्षक संघाची स्थापना
पुणे :- ( आळंदी )श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी तेजश्री स्वप्निल साळुंखे यांची निवड.
आळंदी देवाची- श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, आळंदी देवाची, ता. खेड जि. पुणे प्रशालेच्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गांची शासकीय नियमानुसार पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालकसभेत अभ्यासक्रम, शालेय कामकाज, सहशालेय उपक्रम, विविध समित्या, आणि त्यांची कार्ये इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्गाच्या पालकांमधून पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणीची सभा झाली. निवडलेल्या प्रतिनिधी मधून संघाच्या उपाध्यक्षपदी तेजश्री स्वप्निल साळुंखे यांची तर प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा भालेराव यांची सचिव म्हणून व पालक प्रतिनिधी मधून वर्षा विलास केंद्रे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पालक प्रतिनिधी मधून नरेंद्र पाटील यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था महाराष्ट्रात विश्वसनीय व नावाजलेली संस्था आहे असे मत व्यक्त केले. पालक शिक्षक संघाच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा तेजश्री स्वप्निल साळुंखे यांनी उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व प्रतिनिधींचे आभार मानत सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षिका निशा कांबळे यांनी प्रशालेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत या उपक्रमांतर्गत वाढदिवस या उपक्रमामध्ये पालकांच्या कडून होणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. अजित वडगांवकर यांनी संस्था व शाळा यांच्या प्रगती बाबत माहिती दिली व यामध्ये आज पर्यंतच्या सर्व पालक शिक्षक संघाने वेळोवेळी मदत केली , सहकार्य केले आहे, इथून पुढेही सहकार्य,मदतीची अपेक्षा व्यक्त करत नवीन शिक्षक पालक संघास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. राहुल चव्हाण यांनी आभार मानले. पसायदानाने सभेची सांगता झाली



