बीड

जामखेडच्या वसतीगृहातील रॅगिंग प्रकरणी; सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांची कारवाईची घोषणा

जामखेडच्या वसतीगृहातील रॅगिंग प्रकरणी; सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांची कारवाईची घोषणा

व्हायरल व्हिडिओमुळे वसतीगृह प्रशासन अडचणीत

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड येथील नव बौद्ध शासकीय मुलांच्या वसतीगृहातील रॅगिंग प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आठवीच्या विद्यार्थ्याला पट्ट्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेची गंभीर दखल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली आहे.

या प्रकरणाची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जामखेड तालुका सरचिटणीस तुषार बोथरा यांनी थेट सामाजिक न्यायमंत्र्यांना फोनवरून दिली. घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत सांगितले की,सदर व्हिडिओ अत्यंत दु:खद व निंदनीय आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या प्राचार्य, वॉर्डन तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.तसेच आर्थिक गैरव्यवहार होत आहेत.

या प्रकरणामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसतीगृह व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त तपासानंतर लवकरच पुढील पावले उचलली जातील, असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Back to top button