बीड

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – दिलीप गुगळे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – दिलीप गुगळे

गुरुपौर्णिमेनिमित्त डिप्लोमा कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व शिक्षकांचा सन्मान

जामखेड प्रतिनिधी |:-दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ७५ व्या अमृत महोत्सव व गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून डिप्लोमा ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले.

या वेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप गुगळे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे.
भूमिपूजन सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव अरुण चिंतामणी, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, संचालक शिवाजी तंटक, दीपक होशिंग, राजेश मोरे, प्राचार्य विकी घायतडक, प्रा. सुनील नारके, प्रा. अविनाश फलके,प्रा.संजय राऊत , दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार, कार्यालयीन अधिक्षक संतोष डहाळे, लिपिक संतोष जगताप,प्रा. किशोर हुंबे, जयसिंग पवार,प्रा.पूनम कांबळे,प्रा. आश्विनी पोटफोडे,प्रतिक उदारे,सौरभ पवार आदी मान्यवर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिप्लोमा काॅलेज येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य विकी घायतडक यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगत, “गुरुंचा सन्मान आणि मार्गदर्शन हीच खरी विद्येची वाट आहे, असे उद्गार काढले.

कार्यक्रमात आजी-माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रा. पंकज शिंदे, किरण भोगे, जितेंद्र रोकडे, महेश झगडे यांचा विशेष उल्लेखनीय सत्कार करण्यात आला.

Back to top button