बीड
बच्चु भाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषणास छावा मराठा युवा संघटनेचा जाहीर पाठिंबा

बच्चु भाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषणास छावा मराठा युवा संघटनेचा जाहीर पाठिंबा
बच्चू भाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रहार संघटना तसेच माजी राज्यमंत्री मुक्काम पोस्ट मोझरी जिल्हा अमरावती येथे अन्न त्याग उपोषणास प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला त्याप्रसंगी उपस्थित उमेश घाडगे विदर्भ प्रमुख छावा मराठा युवा संघटना तसेच सौ भाग्यश्री शिर्के महिला विदर्भ प्रमुख छावा मराठा संघटना तसेच पदाधिकारी उपस्थित होते
गेल्या पाच दिवसापासून जनतेच्या विविध मागण्यासाठी बे मुदत आमरण अन्न त्याग उपोषणास बसला आहात हे उपोषण सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वाची आणि हक्कासाठी ची लढाई आहे भारत हा कृषिप्रधान देश असून शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती व शेतकऱ्यासह शेतात राबणारे कष्टकरी शेतमजूर तसेच सुशिक्षित बेरोजगार व दिव्यांग महिला यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा आपण देत आहात हा विषय अतिशय महत्वाचा असून संवेदनशील आहे शेतमजुरांना किमान मजुरी देणे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमाला हमीभाव देणे अशा विविध लागण्यासाठी बच्चू भाऊ अन्न त्याग करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहात या आंदोलनात माझ्या व माझ्या मराठा युवा संघटना तर्फे संपूर्ण जाहीर पाठिंबा आहे ही लढाई सर्व वंचित उपेक्षित आणि गरजू समाज जनता शेतकरी बांधवांसाठी असून आम्ही या लढाईत आपल्या बच्चुभाऊ सोबत आहोत
महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि जनतेच्या वर्तमान आणि भविष्याच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत अन्यथा छावा मराठा युवा संघटना स्वस्थ बसणार नाही भाऊच्या लढ्यात छावा संघटना सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्रभर आंदोलन करणार असे विदर्भ प्रमुख उमेश घाडगे तसेच सौ भाग्यश्री ताई शिर्के महिला विदर्भ प्रमुख यांनी पत्रका द्वारे कळविले आहे


