बीड
कपिलधारवाडी येथे वाघेश्वरीदेवीच्या कलशारोहन वर्धापन दिनानिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन

बीड । प्रतिनिधी:-इथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान पासून जवळ कपिलधारवाडीचे ग्रामदैवत वाघेश्वरी माता देवीचे मंदिर आहे. या देवीच्या मंदिराच्या दुसर्या कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री महंत ह.भ.प.हरिहारनंद भारती महाराज श्रीक्षेत्र तपोवन मोरेश्वर संस्थान कोळवाडी यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने मंगळवार दि.6 मे 2025 रोजी वैशाख शुद्ध ॥ 9 ॥ पासून भव्यदिव्य पाच दिवसीय कीर्तन महोत्सवास प्रारंभ होत आहे.
या कीर्तन महोत्सवामध्ये मंगळवार दि. 6/5/2025 रोजी ह.भ.प.नाना महाराज कदम बंकट स्वामी मठ संस्थान मेकनूर, बुधवार दि.7/5/2025 ह.भ.प अक्षय महाराज पिंगळे विनोदाचार्य (बीडकर), गुरुवार दि. 8/ 5 /2025 ह.भ.प.कल्याण महाराज काळे शिवचरित्रकार (अहिल्यानगर), व शुक्रवार दि. 9/5 /2025 ह.भ.प. शंकर महाराज चिंचकर भागवताचार्य (बिडकुचीवाडी) याचे हरीकिर्तन सेवा होणार आहेत. शनिवार दि.10/5/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प.गु.महंत लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकट स्वामी संस्थान मठ नेकनूर पंढरपूर आळंदी दे. यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.या नाम सप्ताहात महंत ह.भ.प.हरिहारनंद भारती महाराज श्रीक्षेत्र तपोवन मोरेश्वर संस्थान कोळवाडी ,विश्वनाथ आप्पा सलगार श्री. क्षेत्र कपिलधार तसेच दत्त उपासक वैजनाथ महाराज शिंदे दत्त संस्थान बालाघाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मृदंगाचार्य: ह.भ.प. योगेश महाराज जोगदंड कोळवाडी, ह.भ.प.सुशील महाराज शिंदे कपिलधारवाडी ,गायनाचार्य: ह.भ.प.शिवाजी महाराज निवडे कामखेडा, शेषराव महाराज चव्हाण कोळवाडी, महादेव महाराज चव्हाण, अर्जुन महाराज तांगडे, सुशील महाराज शिंदे यांची आहे. तबलावादक :ह.भ.प लखन महाराज शिंदे कर्झणी, काकडा नेतृत्व: ह.भ.प हरिदास महाराज खुळे, ह.भ.प. वसंत महाराज शिंदे यांची आहे.काल्याच्या कीर्तनाने सांगता व महाप्रसाद होणार आहे तरी या कीर्तन महोत्सवाचा व श्रवण भक्तीचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, वाघेश्वरी मित्र मंडळ कपिलधारवाडी यांनी केले आहे.