📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

संतांची व भगवंताची सेवा निरपेक्ष भावाने करावी:- ह.भ.प. महादेव महाराज राऊत 

संतांची व भगवंताची सेवा निरपेक्ष भावाने करावी:- ह.भ.प. महादेव महाराज राऊत
गोरक्षनाथ टेकडी येथे नवनाथ ग्रंथ सांगता व करनिमित्त किर्तन संपन्न
बीड ( प्रतिनिधी) गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे नवनाथ ग्रंथ सांगता व कर निम्मित महादेव महाराज राऊत यांचे सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली महादेव महाराज कीर्तनात पुढे म्हणाले की “मनुष्याने साधुसंतांची सेवा निरपेक्ष भावाने करावे. साधुसंत व भगवंत हे निरपेक्ष सेवा केल्यावर सेवेचे फळ निश्चितच देतात पण काही अपेक्षा ठेवून सेवा करणे हे साधू पासून लपत नाही म्हणून साधुसंतांची सेवा व भगवंताची सेवा ही निरपेक्ष भावाने करावी असे ह भ प महादेव महाराज राऊत अभंग विवेचनांमध्ये म्हणाले
      श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचे पारायण होते नवनाथ ग्रंथ पारायणाची सांगता पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करी दिवशी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाच्या महापंगतीने होते.
     राऊत महाराज पुढे म्हणाले की, गोरक्षनाथ टेकडी येथे निरपेक्ष रूपाने गोरक्षनाथाची सेवा करावी टेकडीवर सेवा करताना कसलीही अपेक्षा ठेवू नये निरपेक्ष सेवा केली की भगवंत व साधुसंत फळ देतात त्याप्रमाणे गोरक्षनाथ टेकडीवर सेवा करताना निरपेक्ष भावाने सेवा करावी असे महादेव महाराज राऊत अभंग विवेचनात म्हणाले यावेळी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती टाळकरी माळकरी भजनी मंडळी गायनाचार्य वादंगाचार्य मृदंगाचार्य यांच्यासह भाविक भक्तांच्या प्रचंड गर्दीमध्ये नवनाथ ग्रंथ सांगता व पोळ्याची कर कार्यक्रम संपन्न झाला. श्रीराम भक्त विष्णुदास महाराज सुरवसे यांनी महादेव महाराज राऊत व गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांना भावार्थरामायनाच्या प्रती भेट दिली
चौकट:- महाप्रसादाच्या महापंगतीने सांगता
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथ पारायण होते या पारायणाची सांगता काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाच्या महापंगतीने संपन्न झाली
Back to top button