रायगड

खालापूर पोलीस उपनिरीक्षक मोहन बहाडकर यांना मा. पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रधान

खालापूर पोलीस उपनिरीक्षक मोहन बहाडकर यांना मा. पोलीस
महासंचालक यांच्याकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रधान

रायगड जिल्हा उत्तर उपसंपादक/मंगेश यादव

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल खालापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहन दत्तात्रेय महाडकर यांना मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. दिनांक 1/5/2025 रोजी पोलीस मुख्यालय अलिबाग येथे माननीय पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते गुणवत्ता पूर्ण सेवेचे मानकरी म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर मित्रमंडळी, पोलीस कर्मचारी, पत्रकार मित्र यांच्याकडूनही बहाडकर यांना मिळालेल्या सन्मान चिन्हांचे कौतुक करण्यात आले.

Back to top button