📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन संपन्न

डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन संपन्न
बीड -शहरातील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 27 एप्रिल२०२५ वार  रविवार रोजी जी.डी.गोयंका युनिव्हर्सिटी गुरगाव व इलाईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या वतीने मोफत इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे प्रमुख उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडचे विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी उपस्थित विद्यार्थी पालक यांना या इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिये संदर्भात विविध दाखले देत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित असणारे या या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे विविध विभातील व युनिव्हर्सिटी मधील सर्व मार्गदर्शकांनी सखोल अशी माहिती या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे
यावेळी विस्तार अधिकारी श्री.तुकाराम जाधव,संस्थेचे प्रशासक डॉ. विश्वंभर देशमाने व डॉ. सुधाकर गुट्टे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर  वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर , कमवि उपप्राचार्य डॉ..नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर, कुश बाजपेयी, मोहन गोरे, सौ.प्रियंका जाधव, गणेश तिडके, ज्ञानेश्वर शेळके, डॉ.आकाश अंभुरे, अर्जुन यादव, अरुण सिंह, विनोद गायकवाड, शरयू मुळे आदी मंचावर उपस्थित होते.
Back to top button