विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो – पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा जयंतीतून संदेश

विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो – पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा जयंतीतून संदेश
महात्मा फुले नगरात विचारांना वंदन , महामानवांची १३४ वी जयंती उत्साहात
भिमप्रेमात न्हालं महात्मा फुले नगर ; जयंती निमित्त उत्साह, अभिमान आणि गौरव
जामखेड प्रतिनिधी – महापुरुषांचे विचार केवळ ग्रंथात न राहता, समाजाच्या व्यवहारात उतरले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, बंधुभावाचा आणि संविधानिक मूल्यांचा विचार आजही तितकाच समर्पक आहे. ‘विचार जागे राहिले की, समाज जागा राहतो’ आणि समाजाला खरी दिशा मिळते,” अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.
शहरातील महात्मा फुले नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंती उत्साहात संपन्न.महात्मा फुले नगर मित्र मंडळांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.या अभिवादन सभेसाठी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार,अमित जाधव, संदीप गायकवाड, युवा नेते राम पवार, प्रताप पवार, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार हे होते.
यावेळी हरिभाऊ कदम,प्रकाश सदाफुले,सिद्धार्थ साळवे, राजेश वाव्हळ,जितेंद्र आढाव,विनोद सोनवणे, बापूसाहेब ओव्हळ,संदीप तुपेरे, जयदीप शिंदे,विनोद घायतडक ,उपेंद्र आढाव ,रजनिकांत साखरे, राजन समिंदर,महेंद्र कदम,श्रीकांत कदम, लखण क्षिरसागर, दादासाहेब घायतडक तसेच नगरसेविका विद्याताई वाव्हळ,शंकूतला साळवे,निशा कदम,शितल कदम,अर्चना भोसले ,अश्विनी साळवे,संघमित्रा कदम ,माधुरी कदम,लक्ष्मी पवार आदी मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच जयंती निमित्ताने खास माता भगिनींसाठी महात्मा फुले नगर मित्र मंडळांच्या वतीने निळे फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. नुकत्याच संगमनेर येथे पार पडलेले संविधान अमृत महोत्सव प्रेमानंद रूपवते पुरस्कारकर्ते दिपक साहेबराव तुपेरे, प्रकाश महादेव सदाफुले, बापूसाहेब अभिमान ओहळ, हरिभाऊ गोविंदराव कदम, विठ्ठल काशिनाथ ससाणे,मंदा महेंद्र घायतडक, निशा रविंद्र निकाळजे, गोकुळ श्रीरंग गायकवाड, साहित्यिक रजनीकांत साखरे यांचा पोलीस निरीक्षक महेश पाटील, जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, ॲड डॉ अरुण जाधव, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापूसाहेब गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन महात्मा फुले नगरचे अध्यक्ष रवि सोनवणे यांनी मानले.



