बीड

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे श्रीसंत एकनाथ महाराज षष्ठी निमित्त प्रस्थान 

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे श्रीसंत एकनाथ महाराज षष्ठी निमित्त प्रस्थान
—-
लिंबागणेश:-( दि.१५) श्री गुरू ईश्वर बाबा भारती श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे श्रीसंत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज षष्ठी  निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन मठाधिपती ह.भ.प.महादेव बाबा भारती महाराज आणि ह.भ‌.प. शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. काल दि.१४ शुक्रवार रोजी सकाळी श्रीक्षेत्र बेलेश्वर व श्रीगुरु ईश्वर बाबा भारती यांचा अभिषेक करून पायी दिंडीचे प्रस्थान झाले.पायीदिंडींचे हे ११ वे वर्ष असुन मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी झाले आहेत. टाळ मृदंगाच्या गजरात ” ग्यानबा तुकाराम” च्या नामघोषात दंग दिंडीतील भाविकांचे दिंडी मार्गावरील भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान महंत महादेव भारती महाराज व शांती ब्रम्ह तुकाराम महाराज यांची ठिकठिकाणी आतषबाजी करत, सडासमार्जन, रांगोळी काढून सुवासिनींनी पाद्यपुजन करत औक्षण करत मनोभावे स्वागत केले. ग्रामस्थांनी दिंडीतील भाविकांची ठिकठिकाणी चहा पाणी,लिंबु सरबत,नाष्टा यांची सोय करण्यात आली होती.काल दुपारच्या भोजणाची पंगत पिंपरनई ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर पायी दिंडी मुक्कामी बेलखंडी गावाकडे मार्गस्थ झाली.
         पायी दिंडी सोहळा १४ मार्च ते २२ मार्च दरम्यान होत असुन पायीदिंडी बेलखंडी,बेलुरा,फुल सांगवी,अर्धपिंपरी,मुंगी, याठिकाणीहुन मार्गक्रमण करत दि.२१ मार्च रोजी पैठण येथे मुक्कामी पोहोचणार आहे.दि.२२ मार्च रोजी ह.भ.प. शांतीब्रम्ह तुकाराम महाराज बेलेश्वर संस्थान बेलगाव यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.नाथषष्ठी सोहळ्यात भजन, किर्तन,भारूड, संगीत भजन आदी कार्यक्रमांची मेजवानी असते. भाविकांच्या जेवणाची आणि मोफत जेवणाची सोय संस्थानच्या वतीने केली जाते.शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या अथक प्रयत्नाने पायी दिंडी सोहळ्याला वेगळे स्वरूप आले असुन पायीदिंडीत सहभागी होणाऱ्या पंचक्रोशीतील भाविकांचा सहभाग उत्तरोत्तर वाढत आहे.
Back to top button