बीड
महिलेच्या घरावर हल्ला,जातीयसलोखा बिघडवण्याचा संशय !

महिलेच्या घरावर हल्ला,जातीयसलोखा बिघडवण्याचा संशय !
अज्ञात आरोपीचा शोध लावून कारवाई करा-गंगाधर काळकुटे
बीड । प्रतिनिधी ;-शहरातील संभाजीनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबीयावर रात्री हल्ला करून तुम्ही ताफ्याला आडवे का आलात असे म्हणत महिलेस मारहाण केल्याची घटना घडली होती प्रामुख्याने मराठा आणि ओबीसी या समाजातील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी कोणीतरी हे मुद्दामून केल्या असल्याचा आमचा संशय असून पोलिसांनी हे आरोपी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे समनव्यक व छावा संघटनेचे अध्यक्ष मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांनी आज पोलीस अधीक्षक बीड यांना शिवाजीनगर पोलिसांच्या माध्यमातून निवेदन देऊन वरील मागणी केली
पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे की कचारवाडी तालुका जिल्हा बीड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील माझ्या गाडीने कट मारल्याच्या कारणाने थोडा शाब्दिक वाद झाला होता आणि तो तेथेच संपला पण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत महिलेला त्यानंतर त्यांच्या बीड शहरातील घरात घुसून तोडफोड आणि मारहाण करण्याचा गुन्हा आपल्या पोलिस स्टेशन मध्ये दोन दिवसापूर्वी दाखल झालेला आहे या प्रकरणातील जे अज्ञात आरोपी आहेत त्यांनी मुद्दामहून मराठा आणि वंजारी समाजात वाद लागावा म्हणून ही घटना केलेली असावी असा मला अधिक संशय आहे म्हणून जे कोणी अज्ञात आरोपी आहेत ते पकडण्यात यावेत यासाठी योग्य तो तपास करून संबंधित घराच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात यावेत तसेच आवश्यक असेल तर माझ्या स्वतःचे आणि माझ्या गाडीच्या चालकासह संबंधीत ताईच्या सोबत असलेल्या त्यांच्या चिरंजीव यांचे सुधा आवश्यक असतील त्या सर्वांचे कॉल डिटेल्स पण काढावेत जेणेकरून जे कोणी अज्ञात आरोपी आहेत ते तत्काळ पकडले जातील ही अपेक्षा आहे
तरी या सर्व प्रकरणातील सत्य बाहेर आणून अज्ञात दोषी आरोपींना शोधून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे



