गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभचे आयोजन !

गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभचे आयोजन !
पुणे प्रतिनिधी :-आळंदी देवाची : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे“गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ” कार्यक्रम गुरुवार, दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शेख कान्तीलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृह, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. शेखर म. जांभुळकर (विभागीय अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ, महाराष्ट्र) , प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. भाऊ भगवंत कड (सी.ए.) अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकार बँक असोसिएशन, मुंबई तसेच मा. श्री. प्रदीपदादा वळसे पाटील अध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व अध्यक्ष – निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळ हे असणार आहेत.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू रोख रकमा देऊन गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश ध. वडगांवकर, उपाध्यक्ष श्री. विलास गो. कुन्हाडे, सचिव श्री. अजित सु. वडांगावकर, खजिनदार डॉ. श्री. ज्ञानेश्वर श्री. पाटील, विश्वस्त श्री. पांडुरंग चं. कुन्हाडे, श्री. प्रकाश दै. काळे, श्री. लक्ष्मण ग. गुंडरे, मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत गृ. मुंगसे, श्री. प्रदीप ग. काळे तसेच पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी मा. श्री. कृष्णा म शेळके. , मा. श्री. डॉ. विवेक ना. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



