वडवणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेस.

वडवणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेस.
बैठकीला आले मेळाव्याचे स्वरूप.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे- राजेंद्र मस्के
वडवणी प्रतिनिधी- शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी वडवणी तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक बोलण्यात आली होती, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम माजी नगरसेवक महादेवराव जमाले पाटील यांनी आयोजित केला होता.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीला वडवणी तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले होते, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याने नवीन कार्यकारणी मध्ये आपल्याला स्थान मिळावे यासाठी वडवणी तालुकाध्यक्ष होण्यासाठी सहा-सात लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. या ठिकाणी बैठकीत तालुका अध्यक्ष पदासाठी आपल्याला मिळावं यासाठी लॉबिंग करताना कार्यकर्ते दिसून आले आहेत.
या बैठकीमध्ये राजेंद्र मस्के असे म्हणाले की बीड जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. यामुळे पक्षाची सत्ता असो किंवा नसो कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत असतात त्यामुळे तालुकाध्यक्ष होण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे,या सर्व अपेक्षा आपण पुढच्या कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण करणार असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे, तसेच या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माजलगाव मतदारसंघाचे नेते मोहनदादा जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना असे सांगितले की माझा पराभव हा अल्पमताने झाला आहे. माझ्यापेक्षा माझा पक्ष मोठा आहे ही ताकद शरदचंद्रजी पवार साहेबांचे आहे कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले असते तर मी नक्कीच माजलगाव मतदार संघाचा आमदार म्हणून निवडून आलेलो दिसलो असतो .परंतु कार्यकर्त्यांनी पक्षाचे पदे घेऊन ज्या पक्षाने उमेदवार दिला आहे त्याच्या विरोधात काम केल्याचे दिसून आले आहेत. यामुळे आगामी काळात ही दुटप्पी धोरण असणारे कार्यकर्ते आता आपण खड्यासारखे बाजूला करणार आहोत. मला प्रामाणिकपणे व गरीब कार्यकर्त्यांनी साथ देण्याचे काम केले आहे अशा कार्यकर्त्यांना नक्कीच विसरणार नाही असे उद्गार मोहन जगताप यांनी बैठकीत काढले.
यावेळी सोमनाथराव माने, श्रीराम मुंडे, महादेवराव जमाले,सुरेश भोरे, रामेश्वर भाऊ ,प्रकाश जेधे, भास्कर उजगिरे, सुग्रीव मुंडे ,खलील पठाण, शेख अखिल भाई ,विशंभर सावंत, बापू घोलप, पठाण इम्रान, अश्विन शेळके, आत्माराम जमाले, डॉ महादेव जाधव, बाबुराव जाधव, शेख अशपाक भाई, बाबासाहेब राऊत, घाडगे सरपंच, जयदत्त खोटे, संभाजी मस्के, सुधाकर चव्हाण, पंकज धांडे, महेश सावंत, बाळासाहेब गात,राकेश बिराजदार, लालासाहेब पन्हाळे, सुरेश माने, शाम कोठुळे, सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



