बीड
‘मैत्रा फाउंडेशनच्या शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

‘मैत्रा फाउंडेशनच्या शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या शिक्षकांना प्रतिष्ठेचा ‘शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. मैत्रा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार वितरण रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे आयोजित समारंभात
राज्य कार्यवाह, विवेक वाहिनी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मा. प्राचार्य डॉ. सविता शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक लोकप्रश्न, बीडचे संपादक श्री. दिलीप खिस्ती, गेवराईचे विस्तार अधिकारी श्री. प्रवीण काळम पाटील, राष्ट्रपती पुरस्कार २०२६ प्राप्त शिक्षिका डॉ. कविता गीते, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्था, बीडचे अध्यक्ष श्री. विजय खोसे, लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्था, शिरूरचे अध्यक्ष श्री. मधुकर सानप, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्था, बीडचे सचिव तथा केंद्रप्रमुख श्री. गोविंद वायकर आणि मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द. ल. वारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला प्राजक्ता पाटील लिखित कळी खुलताना या किशोरवयीन मुलींसाठी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मैत्रा फाउंडेशन, महाराष्ट्र ही संस्था साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. द. ल. वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. याच उपक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन
श्री.संपत माणिकराव गर्जे ह्यांना जीवन गौरव पुरस्कार आणि उद्धव मिसाळ,फुंदे किशोर,अश्विनी गिरी,बाळासाहेब भोसले,संगीता भेरे, महादेवी फुलसुरे,साईना बोडखे
भोसले वैभव आसराजी,मोहिते विकास, राऊत अमोल,
टिपरे दत्तात्रय, संजयकुमार वाळके,संतोष जाधव,
शिंदे सुनील,कराड अशोक, महेंद्र मावाडे अनुराधा लाहोरकर ,तांबे जगन्नाथ ,वर्षा हिंगसे/केंडे,चव्हाण सुनिता, डॉ. दिनेश धनेश्वर,डॉ.मनीषा नागरगोजे,डॉ.कविता गीते पवार दिपाली,मोरे प्रतिमा,वानखेडे दक्षा,तिडके संगीता
चिंचकर सतीश,काटे राजा ,वाघमारे सुरेश,मेहेत्रे सतीश
रेणुका दोडके,शिंदे नितीन,जितेंद्र औताने,हावळे बिबीशन प्रा.सविता बुरांडे,श्री.नानासाहेब गायके,वाघमारे रत्नाकर, सुधाकर राऊत, शेख अंजुम ह्यांना शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.तसेच श्री कचरू चांभारे यांना दुर्गमित्र हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमासाठी संजय राठोड,संगीता आदमाने, बापू धन्वे, योगेश सोळशे ,अंकुश नागरगोजे, उद्धव बडे,अनुराधा धनेश्वर, आशा भोसले,आशा भारती, जयश्री बडे, महादेव डोरले, शितल बळे, अनिता खाडे, यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम सोंडगे यांनी केले.



