📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जगदंबा गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ९१ रक्तदात्यांचा सहभाग

जगदंबा गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ९१ रक्तदात्यांचा सहभाग
तीन दाम्पत्यांनी जोडीने केले रक्तदान; महाप्रसादाचेही आयोजन
गेवराई (सूर्योदय न्यूज) : जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने दि. २० सप्टेंबर रोजी भवानी पेठ, मेन रोड, मोंढा परिसरात भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शारदा स्पोर्ट अकॅडमीचे संचालक रणवीर (काका) पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
जगदंबा गणेश मंडळाची तब्बल ५६ वर्षांची अखंड परंपरा असून, यंदाच्या रक्तदान शिबिराला परिसरातील सर्व धर्मांच्या लहान-थोर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे तीन दाम्पत्यांनी जोडीने रक्तदान करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
यामध्ये श्री. व सौ. शुभांगी वैभव कापसे, श्री. व सौ. प्रणिता शाम रुकर तसेच नगरसेविका श्री. व सौ. रेणुका गणेश रुकर यांनी पती-पत्नीने एकत्रित रक्तदान केले.
रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाम रुकर, सतीश रुकर, योगेश कापसे, रविशंकर वाडकर, बबन शंकपाळ, गणेश रुकर, अंकुश गळगुंडे, गजानन संभाहरे, दत्ता टोणपे, अजय रुकर, गजानन कापसे, अविनाश कापसे, संदीप कापसे, संतोष टोणपे, प्रभाकर कापसे, कृष्णा गळगुंडे, बसवराज मिटकरी, आनंद संभाहरे, उमेश राजूरकर यांच्यासह परिसरातील सर्व गणेश भक्तांनी परिश्रम घेतले.
रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवाला सेवाभावी उपक्रमाची जोड देणाऱ्या जगदंबा गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
Back to top button