टिपरे महोत्सवातून गेवराईच्या प्राचीन लोककलेला नवसंजीवनी : सुरेश जाधव

गेवराई दि.१(प्रतिनिधी) आ. विजयसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिपरे महोत्सव घेऊन गेवराईच्या प्राचीन लोककलेला नवसंजीवनी दिली आहे असे गौरवोद्गार आय बी एन मराठी वृतवहिनीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी केले. शारदा प्रतिष्ठान, गेवराई आयोजित टिपरे महोत्सवांतर्गत भोलोबा (फेर)गीत, रिल्स व सोंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शारदा प्रतिष्ठान, गेवराई आयोजित टिपरे महोत्सवांतर्गत भोलोबा (फेर)गीत, रिल्स व सोंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अट्टल महाविद्यालयातील गोदावरी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, यावेळी शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित, दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, आयबीएन मराठीचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश जाधव, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी संचालक जालिंदर पिसाळ, ॲड.एच. एस. पाटील, परीक्षक ॲड. सुभाष निकम, विष्णू खेत्रे, विलास सोनवणे, गजानन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिपरे महोत्सवातील रिल्स स्पर्धेत प्रथम क्रमांक यश शेटे (तलवाडा) यांनी पटकावला, त्यांना ५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सुरज शिनगारे (आंतरवाली) यांना ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक कार्तिक गणेश गायकवाड (गढी) यांना १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ अविनाश पवार (मानसिंग तांडा) व साहिल सय्यद (संजयनगर) यांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भोलोबा (फेर)गीत स्पर्धेत मनेश्वर महिला मंडळ, तळेवाडी यांना प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह तर लक्ष्मी महिला ग्रुप, मन्यारवाडी यांना द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये, तर एकलिंगेश्वर महिला मंडळ, पाडळसिंगी यांना तृतीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ झुंजार नारी मंच, मोटे गल्ली, गेवराई व जगदंबा महिला ग्रुप, भवानीपेठ, गेवराई यांना प्रत्येकी १ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच टिपरे महोत्सवातील सोंग घेतलेले कलावंत शौर्य नंदकुमार दाभाडे (गेवराई) यांना प्रथम पारितोषिक म्हणून ५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना सुरेश जाधव म्हणाले की, “तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू ठेवले आहेत.” टिपरे महोत्सवाच्या माध्यमातून गेवराईच्या प्राचीन लोककलेला पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम शारदा प्रतिष्ठान करत असून, समाजाला घडविण्याचे कामही प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात परीक्षक ॲड. सुभाष निकम यांनी टिपरे महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार यांनी केले. यावेळी संगीता ढाकणे (लक्ष्मी ग्रुप, मन्यारवाडी) यांनी मनोगत व्यक्त करून शारदा प्रतिष्ठानचे आभार मानले.
कार्यक्रमास दत्ता दाभाडे, महेश मोटे, सुदाम पवार, राणोजी गोंजारे, वसीम फारोकी, दीपक निकाळजे, मोहसिन बागवान, प्रल्हाद शिंदे, रियाज फारोकी, प्रभाकर भालशंकर, बंटी सौंदरमन, सतीश प्रधान, बाबू सय्यद, बळीराम साबळे, सुनील शिंदे, शेख हसीम, शेषराव सदाफुले, सुभहान अली यांच्यासह विविध गावांतील भजनी मंडळांचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()



